थायरॉईड डोळ्यांचा आजार- रुग्णांसाठीची माहिती
थायरॉईड डोळ्यांचा आजार- रुग्णांसाठीची माहिती 1. थायरॉईड डोळ्यांचा आजार म्हणजे काय? थायरॉईड डोळ्याचा रोग ज्याला ग्रेव्ह्स ऑप्थाल्मोपॅथी किंवा ग्रेव्ह्स ऑर्बिटोपॅथी देखील म्हणतात. ही एक ऑटोइम्यून आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती डोळे आणि सभोवतालच्या ऊतींवर हल्ला करते ज्यामुळे इन्फलमेशन होऊन सूज येते. यातील बहुतेक रुग्णांमध्ये थायरॉईडवरही त्याच रोगप्रतिकारक प्रक्रियेचा परिणाम होतो. या आजाराच्या बहुतेक रूग्णांमध्ये थायरॉईड अतिसक्रिय (अधिक हॉर्मोन तयार होणे) असते तर अल्पसंख्य रुग्णांमध्ये थायरॉईड अंडरएक्टिव (कमी प्रमाणात हार्मोन तयार होणे) किंवा सामान्य थायरॉईड (यूथायरॉईड) असते. 2. थायरॉईड डोळ्यांचा आजार होण्याचा धोका कोणाला आहे? • ग्रेव्ह्स रोग ग्रॅव्ह्स थायरोटॉक्सिकोसिस (ओव्हरएक्टिव थायरॉईड) असलेल्या जवळजवळ अर्ध्या रुग्णांमध्ये थायरॉईड डोळ्याच्या आजाराची काही लक्षणे असू शकतात. बहुतेक रुग्णांमध्ये एकाच वेळी ओव्हरएक्टिव थायरॉईड आणि थायरॉईड डोळ्याच्या आजाराची लक्षणे आढळतात. तथापि, सुमारे 10% रुग्णांमध्ये ओव्हरएक्टिव थायरॉईडचे निदान होण्यापूर्वी किंवा नंतरही थायरॉईड डोळ्य